Posts

Showing posts from July, 2020

ऍडम , ईव्ह आणि ऍडम

नाटकाचा परामर्श -   मुख्य पात्रं -                    पुण्यातील एक सुखवस्तू कुटुंब . श्री व सौ ( मुद्दाम कोणतंही आडनाव इथे घेतलेलं नाही ) , श्रींची आई अनाथाश्रमाची आजन्म विश्वस्त आणि माजी संचालिका , भिंतीवर तसबिरींमध्ये श्रींचे वडील , आजोबा आणि आजी . नुकताच अमेरिकेहून उच्चशिक्षण घेऊन भारतात परतत असलेला मुलगा आणि त्याच्याबरोबर अचानकपणे ध्यानीमनी नसताना आलेली त्याची मैत्रीण .   नेपथ्य   -   प्रशस्त ' फ्लॅट ' चा दिवाणखाना , खुलं स्वयंपाकघर , मुख्य दरवाजा , डाव्या बाजूला गच्चीवर जाण्यासाठीचा ' काचेचा सरकता दरवाजा ' , उजव्या बाजूला दोन बेडरूमची आणि एक स्नानगृहाचं दार . काचेच्या दरवाज्यातून बाहेर दिसणारी समोरच्या टोलेजंग इमारतीची आकृती . दिवाणखान्यात आठ व्यक्ती बसू शकतील इतका प्रशस्त ' लाउंजर ' सोफा , दोन आरामखुर्च्या , स्वयंपाकघराच्या ओट्याच्या समोर ' ब्रेकफास्ट चेयर्स '. घराच्या भिंतींपैकी ए...